सोलापूर : पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते भगिरथ भालके यांनी आज भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. याचा मोठा धक्का राष्ट्रवादी काॅंग्रेसला बसण्याची शक्यता आहे. यातच आज भगिरथ भालके यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती”
भविष्यात या मतदारसंघाच्या कामासाठी, विकासासाठी आम्हाला आता रस्त्यावर उतरण्याची गरज आली आहे. आमची तशी तयारीही सुरू झाली आहे. परंतु काल आलेला एका मोहोळच्या आणि सोलापुरच्या पोपटाला बहुतेक माहीत नाही . तो बोलका पोपट खूप बोलून गेला. आज या आनंदाच्या अतिशय उत्साहाच्या सोहळ्यात त्याविषयी बोलणार नाही. उद्यापासून भालके काय चीज आहे, त्याला दाखवून देतो. असा इशारा भालके यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा नेता उमेश पाटील यांना दिला आहे.
हेही वाचा…“देशात स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात शक्तीशाली प्रधानमंत्री म्हणजे इंदिरा गांधी “, शरद पवार
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच के. चंद्रशेखर राव यांच्याकडून देखील पैशाचा ओंगळवण प्रदर्शन सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. इतक्या वर्षांमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी का आले नाहीत. असा सवालही राऊतांनी केला आहे. अशीच नौटंकी करत राहाल तर तेलंगणात देखील पराभव होईल. असं म्हणत बीआरएस पार्टी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…“माझी श्रद्धा आता नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर”, आशिष देशमुखांचं विधान
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आपल्या मंत्र्यांसह त्यांनी आज पंढरपुरात विठ्ठालाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पंढरपुर येथील सरकोली गावामध्ये भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. याठिकाणी जाहीर सभेचा आयोजनही करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…ठाकरे गटातील ‘बडा’ नेता आज एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेंचा आणखी एक मोहरा कमी होणार ?
हेही वाचा…“शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी अन् एकनाथ शिंदेंनी केली ती…”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
हेही वाचा…सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार, शरद पवारांच्या पट्टशिष्याचा मुलगा BRS मध्ये
हेही वाचा…“मनात राग आहे, की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय”, आदित्य ठाकरे