पुणे : पुण्याच्या वर्दळीचा ठिकाण असलेल्या सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकीजवळ एका तरूणीवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पावन मारूती मंदिराजवळ तरूणी थांबली असता त्याठिकाणी हल्लेखोर तरूण आला. अन् त्याच्यात वाद घालण्यात सुरूवात केली. त्यानंतर तरूणीवर हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. परंतु त्याठिकाणाहून तरूणीनी पळ काढल्याने तिचा जीव वाचला. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधाला आहे.
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,
काॅंग्रेसने या घटनेचा व्हिडीओ ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील भरदिवसा हा घडलेला प्रकार आहे. कायद्याची लख्तर वेशीवर टांगली जात असतांना गृहमंत्री काय करतायत? टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर जरा कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष्य द्या फडणवीस महोदय असं काॅंग्रेसने म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल
दरम्यान, दिवसेंदिवस विकृती फोफावत आहे. त्याला रोखणे समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच, पण सरकारचा सुद्धा अंकुश या विकृतांवर असणे आवश्यक आहे. बेरोजगारी व द्वेषाच्या वातावरणात युवा पिढी भरकटली आहे. त्यांच्या हाताला काम देणे व त्यांचं योग्य ते समुपदेशन करणे गरजेचे आहे. पण त्याआधी कायदा-सुव्यवस्थेचा वचक समाजात बसवणे, गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस आपण या सर्व विषयांकडे गांभीर्याने पाहून तत्परतेने पावलं उचलाल, हीच अपेक्षा! असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दिवसेंदिवस विकृती फोफावत आहे. त्याला रोखणे समाज म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहेच, पण सरकारचा सुद्धा अंकुश या विकृतांवर असणे आवश्यक आहे. बेरोजगारी व द्वेषाच्या वातावरणात युवा पिढी भरकटली आहे. त्यांच्या हाताला काम देणे व त्यांचं योग्य ते समुपदेशन करणे गरजेचे आहे. पण त्याआधी… https://t.co/UZqJotLdyE
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 27, 2023
हा प्रकार पुण्यातील आहे आणि तो ही भरदिवसा घडलेला.
कायद्याची लख्तर वेशीवर टांगली जात असताना गृहमंत्री काय करतायत?
टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर जरा कायदा सुव्यवस्थेकडेही लक्ष द्या फडणवीस महोदय! pic.twitter.com/nLUO6uzeag
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सदावर्ते पॅनेलने राष्ट्रवादी पॅनेलचा धु्व्वा उडला..! सर्वाच्या सर्व १९ जागा जिंकल्या
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी