जळगाव : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. एका प्रकरणात गुलाबराव पाटलांनी खडसे यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर खडसेंनी गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्याची आज जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.
हेही वाचा…ठाकरे गटातील ‘बडा’ नेता आज एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेंचा आणखी एक मोहरा कमी होणार ?
२०१६ रोजी एका जाहीर भाषणात गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर पुरावे असतील तर आरोप सिद्ध करून दाखवा, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटलांच्याविरोधात ५ कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्याची आज जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्हीही नेते उपस्थित होते.
हेही वाचा…“शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी अन् एकनाथ शिंदेंनी केली ती…”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्यानंतर गुलाबराव पाटलांना न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर आज न्यायालयात दोन्ही नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली. दोघांकडून गैरसमजतीतून हा प्रकार झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड तसेच समझोता झाल्यानंतर दोघांकडून लेखी घेण्यात येऊन हा खटला मागे घेण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाला आता ब्रेक लागला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल