ठाणे : . राष्ट्रवादी काॅंग्रेसला भिवंडीत मोठा झटका बसला आहे. काॅंग्रेस पक्षाचा आदेश डावलून अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र ठरले. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसला याचा फोटा फटका बसला असून याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,
भिवंडी निजामपूर महापालिका सभागृहात काॅंग्रेसचे ४७ सदस्य असल्याने काॅंग्रेस पक्षाचे पुर्ण बहुमत होते. मात्र ५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रिषिका राका यांच्या विरोधात काॅंग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी केली. बंडखोरांनी विरोधी कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्या बाजूने मतदान केले.
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल
या पक्षविरोधी कारवायामुळे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १९ डिसेंबर २०१९ रोजी पत्र देऊन त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली होती. या प्रकरणी १८ फेब्रुवारी व १६ मार्च रोजी सुनावणीच्या दोन फेऱ्या झाल्या. मात्र. त्यानंतर २९ मार्च रोजी तिसरी सुनावणी देशभरात लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली. कोरोनाचा प्रादुभाव कमी झाल्याने सर्व शासकीय कार्यालय सुरू होते. मात्र सदर कारवाई तात्काळ व्हावी अशी मागणी होत होती.
हेही वाचा…ठाकरे गटातील ‘बडा’ नेता आज एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेंचा आणखी एक मोहरा कमी होणार ?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र शिंदेंनी देखील शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण त्यांच्याकडे गेल्याने आणि अपात्रतेचा निकाल राखून ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याही प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसला भिवंडीत मोठा झटका ..! काॅंग्रेस पक्षाचा आदेश डावलून अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान करणारे १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र ठरले. pic.twitter.com/wDKrMvGZQY
— Harichandra Pawar (@HarichandraP77) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर..” काॅंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी