मुंबई : गेल्या काही दिवसापासून ठाकरेंच्या शाखेवर कारवाई केली जात आहे. यातच आता वांद्रे पुर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेवर कारवाई केली असता शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना चोपलं. यावरून राज्यात आता नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणाबाबत माजी मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
सुषमा अंधारे म्हणाल्या की, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत, असं भारतीय राज्यघटनेनं सांगितलेलं आहे. कालच्या प्रकरणावरून शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरूवात केली आहे, आणि मग अटक झाली पाहिजे, कारवाई केली पाहिजे, असं सुरू आहे. कारवाईच करायची असेल तर मग सर्वांवर कारवाई झाली पाहिजे ना? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक
दरम्यान, वांद्रे पुर्व येथील शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. कारवाई करतांना महाराजांची मुर्ती आणि बाळासाहेबांची प्रतिमा बाहेर नेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली, मात्र कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुलर्क्ष करत अधिकाऱ्यांना शाखेवर कारवाई केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली.
कायद्यासमोर सगळे सारखे आहेत असं भारतीय राज्यघटनेनं सांगितलेलं आहे. कालच्या प्रकरणावरुन शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरुवात केली आहे. आणि मग अटक झाली पाहिजे, कारवाई केली पाहिजे असं सुरु आहे. कारवाईच करायची असेल तर मग सर्वांवर कारवाई झाली पाहिजे ना?
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स…! ‘या’ प्रकरणात १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…पुण्यात दिवसा ढवळ्या तरूणीवर कोयत्याने हल्ला..! “गृहमंत्र्यांनाही बहुथा राजकीय..,” अजित पवारांचा घटनेवर संताप
हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा एक आदेश अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ‘१८’ नगरसेवक ‘सहा’ वर्षासाठी निलंबित
हेही वाचा…“टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर..” काॅंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम