नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नेते पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. यातच आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा निवडणुकांच्या संदर्भात नाशिक दौऱ्यावर येत आहेत. परंतु त्याआधी भाजपला मोठा फटका बसला आहे. भाजप आमदार सीमा हिरे यांचे बधूंनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपचा याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
नाशिक पश्चिमच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात नाशिकचे शहाराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नाशिक रोडचे पदाधिकारी गुड्डू गवई, सिडकोतील सुमित सोनवणे यांचा प्रवेश सोहळा झाला आहे.
हेही वाचा…“..तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत असतांना भाजपचे नेते काॅंग्रेसमध्ये आल्याने शहारात एकच चर्चा रंगली आहे. यातच ग्रामीण भागात भाजपचे वचर्स्व असून काॅंग्रेस आता ग्रामीण तसेच शहरी भागात देखील जम बसवण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुसळधार पावसात ”मुसळधार मोर्चा” होणार, ठाकरे गटाचा ‘राज्य सरकार’ विरूद्ध एल्गार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?
हेही वाचा…“अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा पुर्ण होणार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आज निर्णय घेणार”
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांचे डिस्ने कार्टून स्टाईलमध्ये फोटो व्हायरल, अजित दादांचा तर भन्नाट, पाहा फोटो
हेही वाचा…“ज्यांनी १५ वर्षे मुंबई महापालिका ओरबडली, तेच आता….”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल