सोलापूर : पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते भगिरथ भालके यांनी आज भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. याचा मोठा धक्का राष्ट्रवादी काॅंग्रेसला बसण्याची शक्यता आहे. यातच आज भगिरथ भालके यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा पुर्ण होणार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आज निर्णय घेणार”
चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित भगिरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. त्याआधी राष्ट्रवादी सोडून बीआरएस पक्षात गेलेले भगिरथ भालके हे विधानसभेला कसे निवडून येतात, तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला होता. त्यावर कालचा पोपट बोलून गेला, परंतु उद्यापासून भालके काय चीज आहे, त्याला दाखवून देतो. असं म्हणत भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला.
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांचे डिस्ने कार्टून स्टाईलमध्ये फोटो व्हायरल, अजित दादांचा तर भन्नाट, पाहा फोटो
आपण जबाबदारीने लोकांच्या पुढे जाऊन लोकांना विश्वासात घेऊन काम करीत आहे. कारण शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या माणसांचया पाठीमागे राहणं महत्वाचं आहे. एक सुद्धा शेतकरी बाजूला जाणार नाही हा ठाम विश्वास मनामध्ये आहे. म्हणून ज्या विश्वासाने तुम्ही माझ्या वडिलांवर प्रेम, आशीर्वाद दिला. तोच विश्वास ठेऊन भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करीत आहे. माझ्या वडिलांचं नाव देखील भारत असून या पक्षात आल्याने मला आपल्या वडिलांना जवळ गेल्यासारखं वाटतंय असंही भगिरथ भालके यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटणार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार, सर्व्हे आला समोर
हेही वाचा…सदाशिव पेठेत तरुणीवर हल्याचा थरार, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची बापटांची मागणी
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या बंधूचा पटोलेंच्या उपस्थित काॅंग्रेसमध्ये प्रवेश
हेही वाचा…मुसळधार पावसात ”मुसळधार मोर्चा” होणार, ठाकरे गटाचा ‘राज्य सरकार’ विरूद्ध एल्गार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?