नवी दिल्ली : देशात पाच राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी उडणार आहे. त्याची आता तयारी देशातील राजकीय पक्षांनी सुरू केली असून सत्ताधारी पक्षांना आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. यातच मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा ओपिनियन पोल आला असून भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांचे डिस्ने कार्टून स्टाईलमध्ये फोटो व्हायरल, अजित दादांचा तर भन्नाट, पाहा फोटो
यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मध्यप्रदेशवर विशेष लक्ष दिलं असून त्यांचे दौरे देखील वाढले आहेत. तर केंद्रीय मंत्री अमित शहा देखील मध्यप्रदेशसाठी मोठी रणनीती आखत आहेत. मात्र यातच आता एबीपी न्युजने केलेल्या सर्व्हेत भाजपला मध्यप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा…“ज्यांनी १५ वर्षे मुंबई महापालिका ओरबडली, तेच आता….”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत २३० विधानसभा मतदारसंघापैकी भाजपला १०६ ते ११८ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे काॅंग्रेसलाही १०८ ते १२० जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये काॅंग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर बघायला मिळणार आहे. यातच बीएसपीला ० ते ४ तर अन्य ० ते ४ अशा जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा…“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
या सर्व्हेत सर्वात जास्त मुख्यमंत्री पदासाठी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना ३७ टक्के तर काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ३६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर त्याखालोखाल सिंधिया १२ टक्के दिग्विजय सिंह यांना १ टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती दिली आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई, भ्रष्टचार, स्थानिक मुद्द्यांना लोक पसंती देणार असल्याचं सर्व्हेत म्हटलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सदाशिव पेठेत तरुणीवर हल्याचा थरार, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची बापटांची मागणी
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या बंधूचा पटोलेंच्या उपस्थित काॅंग्रेसमध्ये प्रवेश
हेही वाचा…मुसळधार पावसात ”मुसळधार मोर्चा” होणार, ठाकरे गटाचा ‘राज्य सरकार’ विरूद्ध एल्गार
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?
हेही वाचा…“अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा पुर्ण होणार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आज निर्णय घेणार”