मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एका प्रकरणात चर्चेत आले आहेत. वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने एसटी महामंडळाच्या स्टे ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेत विजय मिळवल्यानंतर त्यांनी नथूराम गोडसेचे बॅनर्स लावून घोषणाबाजी केली आहे. तसेच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर आता काॅंग्रेस आक्रमक झाली आहे.
हेही वाचा…सदाशिव पेठेत तरुणीवर हल्याचा थरार, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची बापटांची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांच्यासमोर नतमस्तक होतात. मात्र त्यांच्याच विचारधारेचे गुणरत्न सदावर्ते हे नथुराम गोडसेचा उदो उदो करतात. नथुराम गोडसे याच्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या डोक्यावर परिणाम झाला. गृहमंत्र्यांना आवाहन करतो की तुमचं सदावर्तेंना समर्थन नसेल तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. असं काॅंग्रेसचे नेते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या बंधूचा पटोलेंच्या उपस्थित काॅंग्रेसमध्ये प्रवेश
सदावर्ते हे मनोरूग्ण असून त्यांच्यावर चांगल्या डॉक्टरकडून उपचार करणं गरजेचं आहे. तसेच देशातील महापुरूषांची जे लोक बदनामी करतील त्यांना तात्काळ जेलमध्ये पाठवलं पाहिजे. एकनाथ शिंदे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर विश्नास राहिला नाही. असा घणाघात देखील काकासाहेब कुलकर्णी यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…पंकजा मुंडेंनतर आता राजू शेट्टी BRS च्या टार्गेटवर, थेट मुख्यमंत्री पदाची दिली ऑफर
हेही वाचा…शिंदेंची निवडणुकीपुर्वी मोठी खेळी, राज्यात ‘७००’ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” उभारणार
हेही वाचा…टेक्नोसॅव्ही पुणे ‘भाजप’ला कळेना फेक मॅसेज, फेसबुकवरील त्या पोस्टमुळे तोंडावर पडण्याची वेळ?
हेही वाचा…BRS पक्षात प्रवेश करतात भगीरथ भालकेंचा पवारांना कडक शब्दात इशारा ! म्हणाले की, “उद्यापासून भालके काय चीज..”
हेही वाचा…भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटणार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार, सर्व्हे आला समोर