मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र पक्षाचा जोरदार महाराष्ट्रात प्रचार सुरू करून दिला आहे. राज्यातील अनेक आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी भारत राष्ट्र समितीत प्रवेश करीत आहेत. तर राज्यातील अनेक नाराज नेत्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली जात आहे. यातच आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना देखील पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या बंधूचा पटोलेंच्या उपस्थित काॅंग्रेसमध्ये प्रवेश
चंद्रशेखर राव यांनी ६०० गाड्यांमधून शक्तीप्रदर्शन करीत पंढरपुर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपल्या मंत्र्यांनासह आलेत. याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाहिर सभा घेतली तर नागपुरला त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील केले. यातच आता संपुर्ण राज्यात अबकी बार किसान सरकार अशा अशायचे बॅनर्स सगळीकडे लागत आहेत.
हेही वाचा…मुसळधार पावसात ”मुसळधार मोर्चा” होणार, ठाकरे गटाचा ‘राज्य सरकार’ विरूद्ध एल्गार
भारत राष्ट्र समितीत येण्यासाठी राज्यातील अनेक नाराज नेत्यांना ऑफर दिली जात आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली. मात्र पंकजा मुंडे यांनी केसीआरची ऑफर धुडकावून लावली. तर स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना देखील भारत राष्ट्र समितीने पक्षात आल्यास मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यात येईल असं सांगण्यात आलं. मात्र राजू शेट्टी यांनी देखील ऑफर नाकारली.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?
राज्यात अनेक सभा घेतल्या जातात हे पाहता खंरच किसान सरकार म्हणून पुढे येतील असे वाटते. या कार्यक्रमामध्ये प्रचंड प्रमाणात खर्च होताना बघून आमचे डोळे दुखवतात आणि राजकारण्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून हा प्रश्न पडतो. आम्हाला सभा, अथवा कार्यक्रम घ्यायचा असेल तर भीक मागावी लागते. परंतु यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे. असं राजू शेट्टी यांनी म्हटलं तसेच मला देखील पक्षात आल्यास मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली. परंतु ती ऑफर नाकारली असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंची निवडणुकीपुर्वी मोठी खेळी, राज्यात ‘७००’ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” उभारणार
हेही वाचा…टेक्नोसॅव्ही पुणे ‘भाजप’ला कळेना फेक मॅसेज, फेसबुकवरील त्या पोस्टमुळे तोंडावर पडण्याची वेळ?
हेही वाचा…BRS पक्षात प्रवेश करतात भगीरथ भालकेंचा पवारांना कडक शब्दात इशारा ! म्हणाले की, “उद्यापासून भालके काय चीज..”
हेही वाचा…भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटणार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार, सर्व्हे आला समोर
हेही वाचा…सदाशिव पेठेत तरुणीवर हल्याचा थरार, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची बापटांची मागणी