मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उद्योगविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा…पंकजा मुंडेंनतर आता राजू शेट्टी BRS च्या टार्गेटवर, थेट मुख्यमंत्री पदाची दिली ऑफर
पुणे आणि औरंगाबाद येथे देशातील पहिल्या सुमारे १२ हजार ४८२ कोटीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. नवी मुंबईच्या महापे येथे होणाऱ्या जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्पाला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…शिंदेंची निवडणुकीपुर्वी मोठी खेळी, राज्यात ‘७००’ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” उभारणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे इलेक्ट्रिकल व्हेईकल्स व बॅटरीची निर्मिती करणाऱ्या इथर एनर्जी कंपनीद्वारे ८६५ कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. एथर एनर्जी ही भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. जी प्रगत आणि कनेक्टेड इलेक्ट्रिक दुचाकी बनवते. या प्रकल्पामुळे राज्यामध्ये पुरवठादार इको सिस्टीम स्थापन होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा…टेक्नोसॅव्ही पुणे ‘भाजप’ला कळेना फेक मॅसेज, फेसबुकवरील त्या पोस्टमुळे तोंडावर पडण्याची वेळ?
रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीच्या २७०० कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पास, २०३३ कोटी गुंतवणुकीच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रकल्प रायगड येथे, जनरल पॉलिफिल्मस कंपनीचा ५०० कोटी गुंतवणूकीचा प्रकल्प नंदूरबार येथे, विप्रो परी रोबोटिक्स कंपनीचा ५४४ कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प सातारा येथे तर ११० कोटी गुंतवणुकीचा गणराज इस्पात कंपनीचा प्रकल्प अहमदनगर येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पुणे येथे देशातील पहिल्या ई-बस निर्मितीच्या ७७६ कोटी गुंतवणूकीच्या पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या घटकाच्या विशाल प्रकल्पास मान्यता देण्यात आली. पुणे येथे पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स या घटकाकडून भारतातील सर्वात प्रगत तांत्रिकदृष्ट्या प्रगत व्यावसायिक इलेक्ट्रिक आणि सदर हायड्रोजन इंधन-सेल वाहन निर्मिती सुविधा उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उद्योगविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात… pic.twitter.com/SrcmON5i2i
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा,” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…बोले तैसा चाले..! “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल…!”, भाजप नेत्यानी केलं कौतुक
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला”, खडसेंचा फडणवीसांवर आरोप
हेही वाचा…“राज्यातील साडेबारा कोटी जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा”, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
हेही वाचा…“गुणरत्ने सदावर्ते मनोरूग्ण, गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”