मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव, तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला अटलबिहारी वायपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…टेक्नोसॅव्ही पुणे ‘भाजप’ला कळेना फेक मॅसेज, फेसबुकवरील त्या पोस्टमुळे तोंडावर पडण्याची वेळ?
बोले तैसा चाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं जावं, अशी मागणी करणार पत्र स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी या निर्णयाची घोषणाही केली. सावरकरांचे नाव वांद्रे-वर्सोवा सी लिंकला देऊन या स्वातंत्र्यवीराच्या बलिदानाला-त्यांच्या स्मृतींना शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा जिवंत करण्याचं,उजाळा देण्याचं काम केलं आहे..असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
हेही वाचा…BRS पक्षात प्रवेश करतात भगीरथ भालकेंचा पवारांना कडक शब्दात इशारा ! म्हणाले की, “उद्यापासून भालके काय चीज..”
दरम्यान, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार आहेत. या योजनेत २ कोटी कार्ड वाटणार असून आता पर्यंत ५ लाखांपर्यत आरोग्य संरक्षण देण्यात आलं आहे. तर राज्यात ७०० ठिकाणी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात येणार असून यासाठी २१० कोटी रूपयांना मान्यता देण्यात आली आहे.
बोले तैसा चाले….
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल!
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं जावं,अशी मागणी करणार पत्र स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं.. आज मंत्रिमंडळ बैठकीत…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला”, खडसेंचा फडणवीसांवर आरोप
हेही वाचा…“राज्यातील साडेबारा कोटी जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा”, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
हेही वाचा…“गुणरत्ने सदावर्ते मनोरूग्ण, गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”
हेही वाचा…पंकजा मुंडेंनतर आता राजू शेट्टी BRS च्या टार्गेटवर, थेट मुख्यमंत्री पदाची दिली ऑफर
हेही वाचा…शिंदेंची निवडणुकीपुर्वी मोठी खेळी, राज्यात ‘७००’ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” उभारणार