मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काल पंढरपुर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यात निवडणुका आणि मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली असून केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरेंनी जिंकला, शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दणका दिला”
2024 च्या लोकसभेपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या विस्तारात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळण्याचा अंदाज असून यात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. यातच मंत्रिपद कुणाला द्यायचं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.
हेही वाचा…कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांचं सुचक विधान, भाजप-शिंदेंचे संबंध ताणले होते
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होणार आहे. राज्याच्या विधानमंडळाचा पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये होण्याच्या शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रिमंडलाचा विस्तार करावा असा अग्राह देखील दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून केंद्र स्तरावर केला जात आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो. अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांच्या गुगलीने मी नव्हे तर “अजित पवार” क्लीनबोल्ड”, मी गुगली टाकली तर..,” देवेंद्र फडणवीसांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…राज्यात “शरद पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस” सामना…! वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप, राजकारण तापलं
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्राने गुंतवणुकीत पुन्हा नंबर १ पटकावला”
हेही वाचा…मुलीसाठी बाप सरसावरला..! “ती स्वत:च कर्तृत्वाने निवडून आलीय,” शरद पवारांचं मोदींना प्रत्यु्त्तर
हेही वाचा…“माझ्या गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली,” फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवारांचा टोला