मुंबई : गेल्या काही वर्षात राज्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणात राहुल नार्वेकर साततत्याने चर्चेत राहिले आहेत. अशातच आता मुंबईत नार्वेकरांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भाजप याबाबत त्यांची उमेदवारी कधी घोषीत करणात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…उद्या रायगडावर शरद पवार गटाची ‘तुतारी’ धुमणार, भव्य लॉंन्चिंग सोहळा, लोकसभेचं रणशिंग फुंकणार
मुंबईत सध्या सहा लोकसभा मतदारसंघ असून दक्षिण मुंबईवर भाजपने अगोदरच दावा सांगितला आहे. दक्षिण मुंबई लोकसभेतूनच राहुल नार्वेकर यांना निवडणुक लढण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.अशातच आता याठिकाणी नार्वेकर विरूद्ध सावंत अशी लढत अटळ झाली आहे.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक लढवून दिल्लीत जाणार का ?” फडणवीसांनी ‘त्या’ चर्चेला दिलं पुर्णविराम, म्हणाले…
दरम्यान, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी उच्च वर्गीय आणि मुस्लिम नागरिकांचं प्राबल्य असून या भागात मराठी उमेदवार अनेकवेळा निवडून आला आहे. नार्वेकर हे कोकणी, मराठी चेहरा आहे. त्यामुळे त्यांना या भागात निवडणुकीसाठी उतरवण्यास भाजपने तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने याठिकाणी काही कार्यक्रम घेण्यास देखील सुरूवात केली आहे.
READ ALSO :
हेही वाचालोकसभेसाठी महाविकास आघाडीत ‘या’ जागांवर खरी रस्सीखेच, वाचा सविस्तर
हेही वाचा…श्रीरंग बारणेंचा पाय आणखी खोलात, राष्ट्रवादीनंतर आता मावळवर भाजपनेही ठोकला दावा
हेही वाचा..महायुतीत गर्दी वाढली, उमेदवारांची आशा माळवली, विदर्भाचा भाजपचा बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर ?
हेही वाचा…मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलंय, ‘हा’ उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचाबीड लोकसभा निवडणुक लढवणार का ? पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेत बदल, म्हणाल्या…