पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपांच्या संदर्भात महाविकास आघाडीची येत्या २७ फेब्रुवारीला बैठक होत आहे. आतापर्यंत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ३९ जागांचं वाटप करण्यात आलं असून उरर्वीत जागांबाबत येत्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहेत. यातच पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेची जागा आता ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असून ठाकरेंनी याबाबत एक वेगळी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…शिरूरचा दावा आढळराव पाटलांनी सोडला, कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार ?
शिवसेना ठाकरे गटाचा हक्काचा लोकसभा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत इतर घटक पक्ष मावळच्या जागेसाठी आग्रह नसल्याचे दिसते.त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानेही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला सोबत घेत काम सुरू केले आहे. नुकतीच आघाडीच्या सर्व शहाराध्यक्ष, व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत समन्वय ठेवण्यासोबत कोणत्याही परिस्थितीत मावळची जागा जिंकून आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्यावर खल झाल्याचे समजत आहे.
हेही वाचा…“अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं,” शरद पवारांचा पणतुचा अजित पवारांवर हल्लाबोल
मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीत एकमत झाल्याचं दिसत नाहीय. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राजकीय गणित बदलली आहेत. त्याचा परिणाम म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीत दिसून येत आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा आपण उमेदवार असणार, असं जाहीर केलं आहे. तर मावळवर राष्ट्रवादीची पकड मजबूत असून आम्हालाच ही जागा देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके करतांना दिसत आहे. तर भाजपचे बाळा भेगडे हे देखील याठिकाणी जोरात हालचाली करतांना दिसत आहे. अशातच महाविकास आघाडीकडून ठाकरे गट संजोग वाघेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला जाणार असल्याचे समजत आहे.
संजोग वाघेरे यांनी आपली ताकद दाखवण्यात आता मतदारसंघात सुरूवात केली आहे. गावभेटी, गावबैठका, संवाद आणि पक्षाचे मेळावे सुरू आहेत. मागील निवडणुकीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे महायुतीतून कुणाला उमेदवार देण्यात येईल. ? त्यावर संजोग वाघेरे यांचा विजयाचं भवितव्य अवलंबून आहे.
READ ALSO :
हेही वाचाबीड लोकसभा निवडणुक लढवणार का ? पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेत बदल, म्हणाल्या…
हेही वाचा…उद्या रायगडावर शरद पवार गटाची ‘तुतारी’ धुमणार, भव्य लॉंन्चिंग सोहळा, लोकसभेचं रणशिंग फुंकणार
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक लढवून दिल्लीत जाणार का ?” फडणवीसांनी ‘त्या’ चर्चेला दिलं पुर्णविराम, म्हणाले…
हेही वाचा..“तुमचा संपूर्ण भाजप जळून खाक होईल, एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात “
हेही वाचा.मोठी बातमी…! ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई