बीड : मागील काही वर्षांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा सुरू आहेत. राज्यात कोणतीही निवडणुक आली की पहिल्यांदा पंकजा मुंडे यांची चर्चा होत असते. परंतु पंकजा मुंडे यांना भाजपकडून अद्याप निवडणुकांच्या संदर्भात कोणतीही संधी दिली जात नसल्याचे दिसून आलं आहे. यातच आता पंकजा मुंडे आगामी लोकसभा निवडणुक बीड लोकसभेतून लढणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं,” शरद पवारांचा पणतुचा अजित पवारांवर हल्लाबोल
वेळ आली तर दुसऱ्या देशात जाऊन लढणार पण प्रतिम मुंडे यांच्या लोकसभेच्या जागेवर लढणार नाही. अशी भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेत काहीसा बदल झाल्याची चर्चा आहे. यंदा बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचं नाव पुढे येत आहे. यातच २०१९ मध्ये बीड विधानसभा निवडणुकीची लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगली होती. मात्र २०२४ च्या बदललेल्या समीकरणांनी पंकजा मंडे यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू आहे. बीड लोकसभेबाबत उमेदवार कोण असणार ते आमच्या पक्षातील वरिष्ठच ठरवू शकतील. परंतु माझ्या मतदारसंघातील लोकांनी माझ्यासाठी भरपुर काम केलं आहे. असं म्हणून पंकजा मुंडे यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार, तारिख ठरली
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या निवडणुकांबाबतच्या चर्चा गेल्या पाच वर्ष ऐकत आली आहे. त्यावर फार लक्ष घालत नाही. त्यामुळे पक्ष जो योग्य निर्णय घेईल. त्यावर आम्ही पुढची भूमिका घेणार. असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. सध्या राज्यात ओबीसी, मराठा, धनगर आरक्षणाचा परिणाम निवडणुकांमध्ये परिणाम होईल. परंतु त्याकडे इतकं काही वाटण्याचं कारण नाही. बीड लोकसभेबाबत उमेदवार कोण असणार ते आमच्या पक्षातील वरिष्ठच ठरवू शकतील. परंतु माझ्या मतदारसंघातील लोकांनी माझ्यासाठी भरपुर काम केलं आहे. बुथरचनेसाठी आढावा घेण्यासाठी मी आले आहे. मतदारसंघात बुथरचनेची जोरदार तयारी झाली आहे. आष्टी मतदारसंघात तर देशात सर्वात जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्या रायगडावर शरद पवार गटाची ‘तुतारी’ धुमणार, भव्य लॉंन्चिंग सोहळा, लोकसभेचं रणशिंग फुंकणार
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक लढवून दिल्लीत जाणार का ?” फडणवीसांनी ‘त्या’ चर्चेला दिलं पुर्णविराम, म्हणाले…
हेही वाचा..“तुमचा संपूर्ण भाजप जळून खाक होईल, एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात “
हेही वाचा.मोठी बातमी…! ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई
हेही वाचा…शिरूरचा दावा आढळराव पाटलांनी सोडला, कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार ?