मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे यांच्या विरोधात सीबीआयने देखील गैरव्यवहार प्रकरणी संपत्ती गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्याच आधारावर ईडीने तपासाला आता सुरूवात केली आहे. बोभाटे हे ठाकरे गटाच्या एका समितीवर पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, शरद पवार गटाला अखेर मिळालं ‘तुतारी’ चिन्ह, आयोगाचा मोठा निर्णय
सीबीआयने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बोभाटे यांच्याविरोधात १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयच्या तपासात त्यांच्यावर दोन कोटी ५८ लाख रूपयांची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा ठपका ठेवला होता. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हानुसार दिनेश बोभाटे हे न्यु इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या लोअर परळ येथील कार्यालयात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असताना एक एप्रिल २०१२ ते ११ जुलै २०२३ या काळात त्यांनी गैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला..! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दु:खद निधन
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून ठाकरे गटातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर देखील जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी इडीने चौकशी केली आहे. तर राजन विचारे, विनायक राऊत, संजय राऊत यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूरचा दावा आढळराव पाटलांनी सोडला, कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार ?
हेही वाचा…“अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं,” शरद पवारांचा पणतुचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार, तारिख ठरली
हेही वाचाबाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचं निधन, उद्धव ठाकरेंनी नियोजित दौरा केला रद्द
हेही वाचा..“ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला”, भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन