मुंबई : बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे. ह्यदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजता त्यांची रूग्णालयातच प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून ते बुलढाणा येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकाळी अकरा ते बारा दरम्यान त्यांचं पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणआर असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा..“आजी माजी, नाराज, जुने पुराने सर्व एकत्र या, आपण क्रांती घडवू,” करूणा मुंडेंचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
मनोहर जोशी यांच्या रूपाने शिवसेनेला आपला पहिला मुख्यमंत्री मिळाला होता. बाळासाहेबाचं स्वप्न मनोहर जोशी यांनी पुर्ण केलं होतं. त्यांच्या निधनानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी नियोजत दौरा रद्द करून मुंबईला रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे शेगाव येथे नियोजित दौरा होता. त्यानंतर ते आता मुंबईला येत आहेत.
हेही वाचा…“..तर मी राजकारणातून संन्यास घेऊन, ” राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांना दिलं खुल चॅलेंज
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती. अशी पोस्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती! असं ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण… pic.twitter.com/TtiXG2AmE9— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 23, 2024
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 23, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला”, भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन
हेही वाचा…“वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, शरद पवार गटाला अखेर मिळालं ‘तुतारी’ चिन्ह, आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचा..महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला..! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दु:खद निधन
हेही वाचा“हाताचा मटनाचा वास गेला असेलच…”उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडसेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
हेही वाचा…“जरांगेंना शरद पवारांचा फोन, आंदोलनासाठी पैसे,” वानखेडेंच्या आरोपावर रोहित पवारांचं तीन ओळीत उत्तर, म्हणाले…