पुणे : राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्यानंतर सर्वात जास्त चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघाची सुरू झाली. शिरूरचा आपला उमेदवार निवडून आणणारच असं जाहीर वक्तव्य अजित पवारांनी कर्जत येथील मेळाव्यात केले. त्यानंतर अजित पवार गटाने सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केलेत. परंतु शिरूरची जागा मीच लढणार असा आग्रह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला होता. त्यामुळे याठिकाणी अजित पवार गटाला मोठी अडचण निर्माण झाली आहे. यातच आता शिरूरचा दावा शिवाजीराव आढळराव पाटलांनी सोडला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असणार ? त्याची चर्चा आता राजकारणात जोरदार सुरू झाली आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला..! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दु:खद निधन
माझा पक्ष आणि महायुती शिरूरच्या तिकीटाबाबत ठरवतील. तिकीट वाटप ठरवताना विजयी उमेदवारानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवाराचा विचार आधी केला जातो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेला मिळालेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूरची जागा शिवसेनेलाच मिळण्यासाठी मागणी करतील. त्यानंतरही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही जागा राष्ट्रवादी किंवा भाजपला द्यायचे ठरविल्यास त्यानुसार नियोजन होईल, याला माझी हरकत नसेल, अशी भूमिका शिवाजीराव आढळराव पाटलांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा….“हाताचा मटनाचा वास गेला असेलच…”उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडसेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
शिवाजीराव आढळराव पाटलांकडे म्हाडा पुणे मंडळाचे सभापती पद आले. त्यानंतर त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यावेळी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना आपली शिरूर लोकसभेबाबत भूमिका जाहीर केली.
शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला दावा सोडल्यानंतर शिरूरची जागा आता अजित पवार गटाला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दौरे वाढले आहेत. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पद्धतीने त्यांचे दौरे देखील सुरू झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार विलास लांडे हे देखील शिरूर लोकसभेतून लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडून शिरूरमधून कुणाला लोकसभेची उमेदवारी देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं,” शरद पवारांचा पणतुचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार, तारिख ठरली
हेही वाचाबाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचं निधन, उद्धव ठाकरेंनी नियोजित दौरा केला रद्द
हेही वाचा..“ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला”, भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन
हेही वाचा…“वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, शरद पवार गटाला अखेर मिळालं ‘तुतारी’ चिन्ह, आयोगाचा मोठा निर्णय