पुणे : राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. तर निवडणुक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आपले पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह सादर करण्याची मागणी केली. त्यानुसार निवडणुक आयोगाने शरद पवारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं तर काल त्यांना निवडणुक चिन्ह देखील देण्यात आलं.
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार, तारिख ठरली
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे निवडणुक चिन्ह दिलं आहे. निवडणुक चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून उद्या रायगडावर भव्य लॉंन्चिंग सोहळा आयोजित केला आहे. या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात येणआर आहे. नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शरद पवार गट लोकसभा निवडणुकीसाठीही रणशिंग फुंगणार आहेत.
हेही वाचा…बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचं निधन, उद्धव ठाकरेंनी नियोजित दौरा केला रद्द
दरम्यान, निवडणुक आयोगाने पक्षनाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता शरद पवार गटाकडून आपापल्या प्रतिक्रिया येत आहेत. तुतारी वाजली म्हणले लढाईला तोंड फुटलं. तुतारी वाजाव अन् अंहकारी विचारांना गाडा. तुतारी वाजवा अन् महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा. तुतारी वाजवा अन् स्वराज्य परत आणणण्यासाठी लढा. तुतारी वाजवा अन् युवांच्या भविष्यासाठी लढा. असं ट्विट आमदार रोहित पवारांकडून करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक लढवून दिल्लीत जाणार का ?” फडणवीसांनी ‘त्या’ चर्चेला दिलं पुर्णविराम, म्हणाले…
हेही वाचा..“तुमचा संपूर्ण भाजप जळून खाक होईल, एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात “
हेही वाचा.मोठी बातमी…! ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई
हेही वाचा…शिरूरचा दावा आढळराव पाटलांनी सोडला, कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार ?
हेही वाचा…“अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं,” शरद पवारांचा पणतुचा अजित पवारांवर हल्लाबोल