मुंबई : अंधेरीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह काॅंग्रेसने देखील ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भाजप या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केल्याने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें साहेब यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!
भाजपने घेतलेल्या भूमिकेबाबत राज ठाकरे यांनी भाजपचे आभार मानले आहेत. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुद़्ढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न मनसे म्हणून कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात याबद्दल तुम्हा सर्वाेंचे आभार असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
“महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं भुजबळांचं काम”; शरद पवारांकडून भुजबळांचा सन्मान
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना भाजपने माघार घ्यायला लावल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही ठिकाणी मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. तर मनसेचे नेते अमेल खोपकर यांनी राज साहेबांनी अंधेरीची निवडणुक एकहाती जिकंली असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
“विलासरावांचं पडलेलं सरकार भुजबळांनी वाचवलं, आणि आज..” अजित पवार
दरम्यान, हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले आहे. ऋतुजा लटके यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरायला अडथळे आले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवायची होती तर आधीच दाखवायला हवी होती. आता पराभव दिसत असल्याने हे उशिरा आलेलं शहाणपण आहे. असं म्हणत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Read also
- “हारण्यापेक्षा पळ काढणे भाजपने मंजूर केले”; काॅंग्रेसचा टोला
- “अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणे, हे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”
- “राजकरणातील विद्यापीठ पवार साहेब आता मैदानात उतरलेत, लक्षात ठेवा”; रूपाली पाटलांनी सुनावलं
- “फडणवीस साहेब अंहकार बरा नव्हे, नियती तो कधी ना कधी उतरवतेच”; राष्ट्रवादीचा टोला
- अंधेरी पोटनिवडणूकीतून भाजपची माघार..! ऋतुजा लटकेंचा मार्ग मोकळा