कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातारा जिल्ह्यात स्थित असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी साखर कारखाना होता. मात्र अडचणीच्या काळात महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव करण्यात आलेला होता. त्यानंतर कारखाना खासगीरित्या विकत घेतला होता.
हे पण वाचा, अजित दादांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केलेली आहे. अनेक दिवसांपासून सीबीआय, ईडी या संस्थांचा वापर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी सर्रासपणे यासंस्थांचा वापर केंद्रसरकारमार्फत सुरु आहे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना नंतर भारतीय जनता पक्षात घ्यायचे असा प्रकार सुरु आहे. हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत आणि त्यामुळे आता ही चुकीची पद्धत बंद करा असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
हे पण वाचा, जयवंतराव भोसले पॅनलची अंतिम विजयाकडे घौडदौड सुरु; पहिल्या पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
फक्त एकाच पक्षाच्या नाही तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी साखर कारखान्यांवर डल्ला मारलेला आहे. ईडीकडे आम्ही ५ वर्ष फेऱ्या मारल्या आणि ४३ कारखान्यांची यादी अजूनही आमच्याकडे शिल्लक आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातलेले आहेत. पाच वर्षांपूर्वीपुरावे दिले होते मात्र आता ईडीला कारवाई करायला कोण लावते हे पाहायलाच हवे. कारण अमुक अमुक माणूस त्रासदायक ठरतोय म्हणून गुन्हा दाखल करून अथवा चौकशीचा ससेमिरा लावत त्याचा काटा काढायचा असा सध्या प्रकार सुरु आहे असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा, “जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..