मुंबई : राज्यात आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून सध्या मेळाव्यांचा आयोजन केला जात आहे. तसेच काॅंग्रेस पक्ष देखील विविध कार्यक्रम राबवत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भाजप मनसेसोबत युती करणार का ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
“माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
अलिकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील भेट घेतली आहे. त्यासंबंधी त्यांनी एक ट्विट केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं होतं. त्यानंतर मुस्लिम समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यात काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र राज ठाकरे यांना याच मुद्दयांवरून भाजपच्या काही नेत्यांनी पाठिंबा दर्शविला होता.
भ्रष्टाचारावरून नेत्यांवर गरळ ओकणारे सोमय्या थेट ‘नॉट रिचेबल’; INS विक्रांत प्रकरण भोवणार
दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजपने देखील राज ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भाजपची रणनिती असल्याचं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी म्हटलं होतं. तसेच भाजप मनसे युती करणार का ? अशा चर्चा देखील रंगल्या होत्या.
Read also:
- तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा
- सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार
- एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
- “आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”
- राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक