मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्याचबरोबर अनिल परब यांचे जवळील सचिन वाजे, बजरंग खरमाटे यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडीसत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदमध्ये यांसदर्भात मोठं वक्तव्य केले असून अनेक धक्कादायक आरोप देखील केले आहेत.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
संजय राऊत म्हणाले की, आज सकाळपासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुकांपर्यतं या धाडी पडतच राहणार. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त काही लोकांनात का लक्ष्य करीत आहेत, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. हे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोठे षड़यंत्र असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
तसेच किरीट सोमय्यांवर टीका करताना ते म्हणाले की, महान महात्मा किरीट सोमय्या सर्वांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात. तसेच सोमय्यांचे वाधवानसोबत आर्थिक संबंध काय? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत यांची अगोदर देखील शिवसेना भवनात पत्रकार परिषद पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळे या पत्रकार परिषद नंतर किरीट सोमय्या आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार. त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
भाजपनेते किरीट सोमय्या हे इडीचे वसुली एंजंट बनले आहेत. तसेच इडी आणि इडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशिन बनली आहे. त्यांना इडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकिट देण्यात आली आहे. यासंदर्भात मी दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल पुरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Read also:
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा