पुणे: पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यावरून सध्या पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षात आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार भांडण सुरु आहे. यात आता महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट होण्यापूर्वी या गावांचा विकास आराखडा आता अखेर पीएमआरडीएच करणार आहे. या निर्णयाच्या विरोधात असणाऱ्या भाजपाला यामुळे धक्का बसलेला आहे.
हे पण वाचा, आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून २३ गावांचा घाट घातला; महापौर मुरली मोहोळांचा घणाघात
२३ गावांचा आराखडा बनविण्याची जबाबदारी सर्वप्रथम पुणे महानगर प्राधिकरणाकडे देण्यात आली होती. मात्र महापालिकेत वर्ग झाल्यानंतर या गावांचा विकास आराखडा करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेलाच मिळावी असा आग्रह सत्ताधारी भाजपने धरला होता. त्यासाठी काल विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महापालिकेत विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी काल रात्री अत्यंत वेगवान हालचाली केल्या. राष्ट्रवादीच्या शहरातील नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपर्क करत तातडीने मध्यस्थीची मागणी केली तर शिवसेनेच्या नेत्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला आणि भाजपाची भूमिका काय आहे याबद्दल सांगितले.
हे पण वाचा, २३ गावांच्या विकास आराखड्याचे अधिकार PMRDA लाच; भाजपच्या कलगीतुऱ्याला राज्य सरकारचा पूर्णविराम!
यानंतर नगरविकास विभागात तातडीने हालचाली झाल्या आणि या संदर्भातले आदेश तयार करण्यात आले. कॅबिनेटची बैठक घेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्व गोष्टी मुख्यमंत्र्याच्या कानावर घातल्या आणि आदेशावर सही घेण्याचे काम फत्ते केले. आदेशावर सही झाल्यानंतर वेळातच पुणे महापालिकेच्या वर्तुळात बातमी वेगासारखी पसरली. भाजपने काल घेतलेल्या सभेला काहीच अर्थ उरला नाही आणि महविकास आघाडीने जे पाहिजे होते ते रात्रीतून साध्य केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा,
- “यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षालाही मिळतात”, राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करा, मी सपोर्ट करतो; फडणवीसांची भुजबळांना राजकीय साद
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी खलबतं; महाविकास आघाडी थेट नियमच बदलणार!
- कौरव कोण?, पांडव कोण? याचं मूल्यमापन फडणवीस, पाटीलच करतील – विनायक मेटे
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?