मुंबई : ‘प्रेश्नम’नं भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची त्रैमासिक मान्यता रेटिंग सुरू केली आहे. यासाठी पहिल्या फेरीत त्यांनी १३ राज्यांची निवड केली होती. या राज्यांत भारतातील ६७% लोकसंख्या आहे. यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
उद्धव ठाकरे : १३ राज्यांच्या सर्वेक्षणातून सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री
या सर्वेक्षणानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक रेटिंग मिळालं असून, सर्वेक्षणात जवळपास ४९% मतदारांनी, उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. उद्धव ठाकरेंनंतर या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान असून, त्यांच्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा क्रमांक आहे.
१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या १३० करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास ११.५ करोड आणि राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील. pic.twitter.com/z9UHjQggOG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 14, 2021
शरद पवारांनी स्पष्ट करावं की, ते नक्की कोणत्या पदाचे उमेदवार आहेत – सुधीर मुनगंटीवार
वर उल्लेखलेल्या १३ राज्यांतील जवळपास १७,५०० मतदारांचं सर्वेक्षण करुन ‘प्रेश्नम’नं हा निष्कर्ष काढला आहे. तसेच, यात प. बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांची नुकत्याच निवडणुका झाल्यामुळे निवड करण्यात आली नसून, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा पुढील टप्प्यात समावेश करण्यात येईल.
बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, पाहूया ताकद – फडणवीसांच चॅलेंज
दरम्यान, यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून, “१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली (आहेत.) भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. महाराष्ट्राची जवळपास ११.५ कोटी (लोक राहतात) आणि (देशात एकूण) राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील,” असा जोरदार खोचक टोला त्यांनी लागावला.
Read Also :
- आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करा, मी सपोर्ट करतो; फडणवीसांची भुजबळांना राजकीय साद
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी खलबतं; महाविकास आघाडी थेट नियमच बदलणार!
- कौरव कोण?, पांडव कोण? याचं मूल्यमापन फडणवीस, पाटीलच करतील – विनायक मेटे
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?
- संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केल्यास, मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार’; उमा खापरेंचा इशारा