जळगाव : गेल्या काही दिवसापासून रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची कन्या तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रोहिणी खडसे या विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे त्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नसतील. असं आमदार एकनाथ खडसे यांनी जाहीर केले आहे. यातच रावेर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीची असून याठिकाणी राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येईल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा….ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल
रावेर लोकसभा मतदारसंघातून रोहिणी ताई यांनी कधीही विचार केलेला नव्हता. त्या विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या चार ते पाच वर्षापासून काम करीत आहेत. त्यामुळे रोहिणीताई या रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार नसतील असेही त्यांनी सांगितले आहे. रावेरची जागा ही राष्ट्रवादीची असून आमच्याकडील सात ते आठ उमेदवार निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. या उमेदवारांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची माहिती घेण्यात आली. तर काही उमेदवारांची यातून छाननी करण्यात आली. यातील उमेदवाराची निवड उद्या होईल. असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा..“लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील,” एक देश एक निवडणुकीबाबत राष्ट्रपतीकडे अहवाल सादर, राजकीय हालचाली वाढल्या
महाविकास आघाडीकडून राज्यातील ४८ जागांचा वाटप जवळपास निश्चित झाला आहे. चार ते पाच जागांसाठी थोडा गोंधळ आहे. परंतु त्याचाही निर्णय आता लवकरच लागणार आहे. सगळ्याच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार लढणार आहेत. यातच केंद्र सरकारच्या कामावर महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. असेही खडसेंनी म्हटलंय.
दरम्यान, यातच भाजपने रक्षा खडसे यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे रावेर मध्ये खडसे विरूद्ध खडसे असा सामाना होऊ नये म्हणून त्यांना उमेदवारी दिली आहे का ? त्यावर खडसे म्हणाले की, या अशा अनेक कथा जन्मला येतील. त्यावर कोणताही विश्वास ठेऊ नका. यातच उमेदवार घोषीत झाला की रावेरची निवडणुकीत अतिशय चुरशीची होईल. त्याठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल. तसेच उद्या या जागेसाठी उमेदवार घोषीत झाला की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच ; माझंही तेच मत ,” शरद पवारानंतर राऊतांची मोरेंनी घेतली भेट
हेही वाचा..“शिंदे गटात राजकीय भुकंप, शिंदेंचे १२ आमदार पुन्हा ठाकरेकडे जाणार “?
हेही वाचा…तर पुणे लोकसभेची लढत तगडी होणार ; कॉंग्रेसकडून बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीचा उद्या बिगूल वाजणार, महाराष्ट्राकडे विशेष लक्ष
हेही वाचा…मोठी बातमी..! 2024 च्या लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार, हालचाली वाढल्या