जळगांव : मुक्ताईनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष कमालीचा वाढला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चांदवड येथून घराकडे निघालेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका ऍड. रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर काल रात्री अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे.
“…खरंतर नवाब मालिकांनी माफी मागितली पाहिजे”; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
या हल्ल्यात त्यांनी गाडीवर थेट दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा संचालिका रोहिणी खडसे या गाडीतच होत्या अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. थेट खडसेंच्या मुलीवरच हल्ला झाल्याने मुक्ताईनगरमध्ये तणाव वाढला आहे. जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीपासून स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष वाढलेला आहे. आता हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
एसटीच्या कामगारांवर केलेली बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही; अनिल परबांची स्पष्टोक्ती
विधानसभेतही या वादाचा परिचय महाविकास आघाडीलाला आला आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे असं म्हणत पोलिसांमध्ये तक्रार केली होती. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती दिल्याचं खडसे यांनी सांगितलं आहे.
‘हल्लेखोरांकडे पिस्तूल व तलवारी अशी शस्त्र होती. हल्ला कुणी केला हे मला माहित आहे. मात्र आता कोणाचेही नाव समोर आणणार नाही. पोलीस तपासात ती माहिती समोर येईल,’ असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसंच सध्या मी प्रवासात आहे. या हल्ल्याप्रकरणी रोहिणी खडसे तक्रार दाखल करतील, असंही ते म्हणाले.
Read also:
- आज अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे कोर्टात; नागरपूरचा दौरा अर्धवट सोडून नारायण राणे कणकवलीत दाखल
- ठरलं तर..! राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार; तारीखही फिक्स
- महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका – नाना पटोले
- अनिल देशमुखांच्या अडचणी संपेना; न्यायालयीन कोठडीमध्ये आणखी १४ दिवसांची वाढ
- देवेंद्र फडणवीसांनी फिरवला फोन; नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, उद्या कोर्टात फैसला