मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी होणार आहे. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांना ईडीने समन्स बजावले होते. यातच ईडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. तर कार्यकर्त्यांकडून एकच दादा रोहित दादा अशा घोषणा करत इडीच्या बाहेरील परिसर घोषणांनी दणाणून सोडला आहे. यावेळी शरद पवार गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. तर यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा विरोधकांना डिवचलं आहे.
हेही वाचा…मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ? प्रकरण काय ?
रोहित पवार इडीच्या चौकशीला आले आता. रवींद्र वायकर कधी येणार? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. ठाकरे सरकारच्या काळातले हे घोटाळे आहेत. याचा हिशोब तर द्यावाच लागेल असंही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत रवींद्र वायकर इडीच्या रडारवर आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवलकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू, नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा…मोठी बातमी…! “कॉंग्रेस करणार पुणे लोकसभा जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा”
रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ?
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलावात फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने 50 कोटी रुपयांत कन्नड सहकारी साखर कारखान्याची बँक लिलावातून खरेदी केली होती. पण या लिलावात सहभागी असलेल्या कंपनी बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कार्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणावरून रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या लिलावात फेरफार करून कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या ५० कोटी रूपयात खरेदी केला होता. असा आरोप सोमय्यांनी केला आहे. त्यानंतर रोहित पवार यांच्यावर इडीने कारवाई केल्याचं सांगितलं जातंय.
रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी होत असतांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते मुंबईत जमा झाले आहेत. त्यामुळे इडीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर कार्यकर्त्यांकडून एकच दादा रोहित दादा, आमचा दादा पळणारा नाही तर लढणारा दादा अशा आशायचे बॅनर देखील कार्यकर्त्यांकडून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे आता चौकशीत काय माहिती उघड होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेपुर्वी इंडिया आघाडीत मोठी फुट , ममता बॅनर्जींनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…नदीपात्रात बोट उलटली, ६ महिला बुडाल्या, नदीकाठवरच नातेवाईकांचा आक्रोश
हेही वाचा…“ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेल्या उंदरांना लवकरच बाहेर काढू”, ठाकरे गटाने दिला इशारा
हेही वाचा…“रोहित पवारांवर सुडाची कारवाई, शेवटपर्यंत लढत राहू,” सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…रामलल्लाच्या मिरवणूकीवर दगडफेक, मग थेट बुलडोझर कारवाई, मीरा रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात