गडचिरोली : मिरची तोडण्यासाठी नदीपात्रातून जाताना मजूर महिलांच्या . एक नाव नदीकाठावर उलटल्याने आठ जण सुखरूप वाचले. परंतु दुसऱ्या नावेतील आठ जण बुडाले. त्यातील ६ जणांना जलसमाधी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून नदीकाठावरच नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळाला. यामुळे गावकरी सुन्न झाले तर सायंकाळच्या पावसामुळे बचावकार्यातही अडथळा आला.
हेही वाचा…“पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच…”जितेंद्र आव्हाडांचं सुचक विधान
चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील घटनेची सरकारने देखील गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. यात ते म्हणाले की, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर गणवीर येथे बोट बुडून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे. ५ महिला अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, ठाकरे गटाने मांडले हे चार ठराव ?
जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, एनडीआरएफ आणि जिल्हा पोलिसांच्या बचाव चमू तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मी विनम्र श्रध्दांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर गणवीर येथे बोट बुडून झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहे. 5 महिला बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, एनडीआरएफ…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेल्या उंदरांना लवकरच बाहेर काढू”, ठाकरे गटाने दिला इशारा
हेही वाचा…“रोहित पवारांवर सुडाची कारवाई, शेवटपर्यंत लढत राहू,” सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…रामलल्लाच्या मिरवणूकीवर दगडफेक, मग थेट बुलडोझर कारवाई, मीरा रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, रोहित पवारांवर ईडीची कारवाई का ? प्रकरण काय ?
हेही वाचा…मोठी बातमी…! “कॉंग्रेस करणार पुणे लोकसभा जिंकण्यासाठी सक्षम असलेल्या उमेदवाराची घोषणा”