कोल्हापूर : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सध्या साहेबांचा संदेश या कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी कोल्हापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अनेकांचा विरोध डावलून मुश्रीफांना संधी दिली पण आता त्यांचेच कार्यकर्ते अडचणी निर्माण करतांना दिसत आहेत. असं रोहित पवारांनी आरोप केला आहे. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. आता त्यावर पुन्हा एकदा रोहित पवारांनी सभेतून उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्र्यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’, महापालिका आयुक्तांना दिली कौतुकाची थाप
मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी आणि त्याला ताकद देण्यासाठी आलो आहे. प्रतिगामी विचारांना त्याची जागा दाखवण्यासाठी आलो आहे. शिव-शाहू-फूले आंबेडकरांच्या विचारांना भाजपकडून तडा आणण्याचं कामं केलं जात आहे, पण त्या विचारांना उंचीवर नेण्याचे काम आम्ही करू. असं म्हणत रोहित पवारांनी हसन मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी क्लिनचीट दिली, पण आता थेट जप्तीचे आदेश”, भाजप आमदाराच्या अडचणी वाढल्या
दरम्यान, रोहित पवारांच्या टिकेला हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे म्हणून हे सर्व करीत आहे. असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुश्रीफांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, रोहित पवार राजकारणात नवखे आहेत. ते कशासाठी इतका मोठा धाडस करताहेत ते माहिती नाही. अजित पवार यांची जागा रोहित पवारांना घ्यायची आहे. असं वाटत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले”, विरोधी पक्ष नेत्याचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवारांचं राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील”
हेही वाचा…“सत्ताकारण जरूर करावं पण.., ” सध्याच्या राजकारणावर गडकरींची नेत्यांना चपराक
हेही वाचा…शिंदेंच्या आमदारांचं ६ हजार पानी उत्तरात अनेक दाखले, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष्य
हेही वाचा…शरद पवारांच्या विचारांपासून दुर जाणे म्हणजे गद्दारीच