मुंबई : एसटी आंदोलनाचा मुद्दा राज्यात अजूनही जोरदार तापलं जात आहे. कारण एसटी आंदोलनकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बंगल्यावर हल्ला केल्यानंतर तो अजून तापला गेला. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला होता. आता याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
मुंबई, सातारा, कोल्हापुर, बीड सदावर्तेंचा पुढचा मुक्काम ठरला! 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली
सदाभाऊ खोत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना बेसिक पगारवाढ देण्यात आली त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि मी एसटी आंदोलनातून बाहेर झालो. राज्य सरकार एसटीचं विलिनीकरण तसेच सातवा वेतन देऊ शकत नाही. अशाच गोरगरीब कामगारांचं नुकसान होऊ नये म्हणूून आम्ही संप मागे घेतला आणि आज जो निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यात विलिनीकरण झालं ना सातवा वेतन आयोग मिळला. यात काही लोक कामगारांची दिशाभूल करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, म्हणत पीएफआयचा इशारा! राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?
शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्याचं आम्ही समर्थन करीत नाही. परंतु मवाळमध्ये शेतकरी पाणी मागायला आला त्यांनी तुम्ही गोळ्या घातल्या. ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड घातली. माझ्यावर ऊस आंदोलनात बावशी फाट्यावर राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला. आम्ही इतका मार खाल्ला तरी आकांततांडव कधी केला नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? खोतांचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
दरम्यान, राज्यात जे काही आता सुरू आहे. ती फक्त स्टंडबाजी चालू आहे. पवारांची एसटी कामगार संघटना मोडीत निघाली आहे. त्यामुळेच गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना महाराष्ट्र दर्शन सुरू आहे. एसटी कामगार आपल्या दावणीला यावा म्हणून हे सगळं चाललं आहे. एकप्रकारे हे सरकार आणि पवार साहेब एसटी कामगारांना दहशतवादी असल्याप्रमाणे वागणूक देत आहेत. असंही त्यांनी सांगितलं आहे.
Read also:
- भाजपचं सरकार असताना मशिदीवरील भोंगे का उतरवले नाहीत? हिंदु परिषदेचा भाजपला सवाल
- “दंगलीचं काम भाजपने राज्यात दुसऱ्यांकडे सोपवलंय”; राऊतांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
- राज ठाकरेंच्या सुरक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गृहमंत्र्यांनी केलं मोठं भाष्य
- सिल्व्हर ओकवरील हल्ला हा तर माझ्या आईवरच झालेला हल्ला- सुप्रिया सुळे
- तुरूंगात जाणार पण रूबाबात! न्यायालयीन कोठडीत नेतांना सदावर्तेंनी उडवली काॅलर