औरंगाबाद : राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजे सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी तुफान राडा घातला होता. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे पवारांच्या निवासस्थानावर धडक देत बांगड्या फोडल्या, चप्पल आणि दगडफेक केली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना समोरं जात त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या घरावरील हा हल्ला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सदावर्तेंना अटकही करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.
“सत्ता गेल्यानं विरोधकांची प्रमाणापेक्षा जास्त तडफड”; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
सुप्रिया सुळे म्हणाल्या की ‘सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता आणि माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला आहे, त्या औरंगाबादेत बोलत होत्या. दरम्यान, सुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पवारांच्या घरावरील हल्ल्याचा विषय चर्चेत आलाय. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
“बहुजन समाजाचं नेतृत्व बाहेर यायला लागलं की, त्याला दाबायचं काम पवार कुटुंबीय करतं”
एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांची न्यायालयाने पुन्हा 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना दिलासा मिळला असून त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. अशातच आता गुणरत्ने सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
3 मे पर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा..! नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांबाबत अल्टिमेटम
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यामागे गुणरत्ने सदावर्ते यांचा हात असल्याचा आरोप ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. अशातच आता सदावर्ते यांची रवानगी न्यायालयीने कोठडीत नेण्यात आलं. त्यावेळी त्यांनी उदयनराजेंसारखी काॅलर उडवली. त्यांची ही काॅलर उडल्याची स्टाईल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.
Read also:
- तुरूंगात जाणार पण रूबाबात! न्यायालयीन कोठडीत नेतांना सदावर्तेंनी उडवली काॅलर
- मुंबई, सातारा, कोल्हापुर, बीड सदावर्तेंचा पुढचा मुक्काम ठरला! 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली
- ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, म्हणत पीएफआयचा इशारा! राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?
- आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? खोतांचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
- “एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला