मुंबई : मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भुमिका सध्या राज्यात चर्चेत आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. येत्या ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचे राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी भाजपच्या सत्ताकाळात मशिदीवरील भोंगे का हटवले नाहीत? असा सवाल करीत त्यांनी भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, म्हणत पीएफआयचा इशारा! राज ठाकरेंना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?
प्रवीण तोगडीया म्हणाले की, राज्यात तुमचं सरकार असताना तर तुम्ही भोंगे हटवले नाहीत. तर मग आता दुसऱ्या कोणाचं तरी सरकार आल्यानंतर तुम्ही भोंगे हटवण्याची मागणी करत असाल तर चांगली गोष्ट आहे. तसंच हे भोंगे उतरवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देण्याची विनंती देखील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारकडे करावी म्हणजे हा प्रश्न कायमचा संपून जाईल, असा टोला देखील त्यांनी लगावला.
आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? खोतांचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
प्रवीण तोगडीया यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषदेचे अनेक वर्ष काम केले आहे. मात्र काही वर्षापूर्वी त्यांचा संघटनेतील इतर नेत्यांशी वाद झाला आणि तोगडीया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेची स्थापना केली. त्यानंतर तोगडीया यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टिका केली.
“एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय”; भाजप नेत्याचा एकनाथ खडसेंना टोला
दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांबाबत लवकरच नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तर नाशिकचे आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत परवानगी अनिवार्य करण्यात आली असून त्याठिकाणी नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मशिदीवरील १०० मीटर अंतरावर हनुमान चालिसा लावण्याचंही त्यांनी निंबर्ध टाकले आहेत.
Read also:
- “दंगलीचं काम भाजपने राज्यात दुसऱ्यांकडे सोपवलंय”; राऊतांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
- राज ठाकरेंच्या सुरक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गृहमंत्र्यांनी केलं मोठं भाष्य
- सिल्व्हर ओकवरील हल्ला हा तर माझ्या आईवरच झालेला हल्ला- सुप्रिया सुळे
- तुरूंगात जाणार पण रूबाबात! न्यायालयीन कोठडीत नेतांना सदावर्तेंनी उडवली काॅलर
- मुंबई, सातारा, कोल्हापुर, बीड सदावर्तेंचा पुढचा मुक्काम ठरला! 14 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली