सांगली – मराठा आरक्षणाच्या (maratha reservation)मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर उत्तर देताना सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी नवाब मालिकांचा चांगलाच समाचार घेतला. “नवाब मलिक तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम आहात. त्यामुळे आपण मराठा समाजाला शहाणपणा शिकवण्याचे काम करू नये”, असा इशारा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.(sadabhau khot slams nawab malik over maratha reservation)
ते म्हणाले, “मराठा आरक्षणावर नवाब मलिक सतत काही न काही बोलत असतात. पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, राज्यात पंधरा वर्षे तुमचे सरकार होते. त्यावेळी तुम्ही काय शेनी लावायला रानात गेला होता का? तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही?” असा सवाल सदाभाऊ खोत यांनी नवाब मलिक यांना केला.
“नवाब मलिक, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम आहात. गुलामाच्या बोलण्यास फारसे महत्व दिले जात नाही. त्यामुळे तुमच्या बोलण्याला आम्ही फारसे गांभीर्याने घेणार नाही. परंतु मराठा समाजामध्ये दुही निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर मराठा समाज हा लढवय्या आहे. जी गोष्ट त्याला मिळत नाही. ती तो हक्काने, लढाई करून प्राप्त घेतो. त्यामुळे तुमच्यासारख्या गुलामाने मराठा समाजाला शहाणपणा शिकावण्याच काम करू नये.” असे सदाभाऊ खोत म्हणाले
Read Also :
- “कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी आणि हतबल”
- या सरकारचे निर्मातेच बारधार्जिणे, त्यांना फक्त बारचालकांचं वीजबिल दिसतं
- फडणवीसांनी साधला वजनदार मंत्र्यांवर निशाणा म्हणाले…
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण
- मराठा आरक्षणासाठी पाऊल पडणार पुढे? आघाडी सरकार “हा” मोठा निर्णय घेण्याची शक्यता