जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, त्याचा आम्ही सन्मान करतो. पण आमच्या लेकराबाळांचा प्रश्न आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय आता थांबणार नाही. असा निर्धार मनोज जरांगे पाटील करत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. आज भाजपचे माजी खासदार संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन संवाद साधला आहे.
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार
संभाजी राजे म्हणाले की, गरिब मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी २००७ सालापासून संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. राजर्षी शाहू महाजांनी सुरूवातीला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. २०१३ च्या दरम्यान आझाद मैदानावर आम्ही आंदोलन केलं होतं. त्याठिकाणी काय झालं त्याबद्दल बोलणार नाही. परंतु आता मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मी स्वत: याठिकाणी आलो आहे.
हेही वाचा…काही तरी शिजतंय? मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
मनोज जरांगे पाटलांनी मागील कित्येक वर्षापासून आंदोलन करीत आहे. माझा छत्रपती संभाजी महाराजांचा वंशज म्हणून याठिकाणी आलो आहे. मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य आहे. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सुरूवातीपासून मनोज जरांगे पाटील शब्दाला पक्के राहिले आहेत. कोल्हापुर मधून धडपडत येथे आलो आहे. याआधी देखील रात्रीचा प्रवास करून अंतरसराठी गावात आलो होतो. आपल्या जीवापेक्षा समाजासाठी लढणाऱ्याला ताकद देण्यासाठी त्याला पाठिंबा, बळ देण्याचं काम छत्रपती घराणेंचं आहे. असंही त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटलांनी पाणी पिऊन तरी उपोषण सुरू ठेवावं, असं संभाजी राजे यांनी म्हटलं होतं. त्यावर संभाजी राजेंचा शब्द मोडणार नाही, आजच्या दिवस पाणी घेऊन उपोषण करतो. असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी आज उपोषणाच्या वेळी लगेचच पाणी घेतलं.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार