मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अचानकपणे राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर राजकीय तर्कवितर्क केले जात आहे. निलेश राणे यांच्या नाराजीमागे पालकमंत्री रविंद्र चव्हाण असल्याची चर्चा दुसऱ्या बाजूला रंगली आहे. त्यामुळेच आज रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी एकाच गाडीतून जात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधून याप्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…भरसभेत भास्कर जाधवांनी मोदींची केली मिमिक्री, मोदींवर चढवला जोरदार हल्ला
निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नक्की काय घडतंय? ते सर्वांना समजत नव्हतं. त्यानंतर त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चा केली आहे. संघटनेमध्ये काम करत असतांना छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली होती. असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी देखील सर्व लोकांनी समजून घेतलं पाहिजे. या सर्व विषयांमध्ये आम्ही सर्वांनी गांभीर्याने विचार करून सर्वच निवडणुकांबाबत योग्य निर्णय घेऊ असं आश्वासनं दिलं. छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून न घेतल्याने निलेश राणे नाराज होते. एक चांगला कार्यकर्ता पक्षातून बाहेर जाणं हे पक्षाला परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी पक्षातच राहावं अशी समजूत घातली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील सकारात्मक चर्चा झाली आहे.
दरम्यान, निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधूदुर्गात त्यांचा झंझावत असलेला पुढे सुरूच ठेऊ. आमदारकी, खासदारकी यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी लढणारे कार्यकर्त्यांच्या भावना ते कार्यकर्ते सांगत होते. त्यांच्याशी चर्चा करित होते. त्यामध्ये काही दुलर्क्ष होत होते. त्यामुळे निलेश राणेंची नाराजी होती. पुढे अशा काही गोष्टी घडणार नाही. याची आम्ही दक्षता घेऊ असंही रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…काही तरी शिजतंय? मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?