मुंबई : बिअरवरील उत्पादन शुल्कात दरवाढ केल्याने बिअरच्या विक्रित घट होत आहे. यामुळे बिअरच्या विक्रिचा आलेख व परिणामी मिळणारा शासनाला महसूल कमी होत आहे. यातच बिअरवरील उत्पादन शुल्काचा दर इतर मद्यांपेक्षा जास्त असल्याने बिअरच्या किंमतीमुळे ग्राहकर बिअर पिण्याकडे आकृष्ट होत नसल्याचं सरकारच्या निर्देशनात आले आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टिकास्र् सोडलं आहे.
हेही वाचा…“तुमचा मतदारसंघ हा माझाच मानते,”पंकजा मुंडेंनी विधानसभा मतदारसंघ निवडला, ? सभेतूनच दिलं संकेत
मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे. रेशनवर बियर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बियर ओतनार वाटतं सरकार… जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे. असा हल्लाबोल काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
हेही वाचा…“खडसे आडनावामूळे पक्षातून डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..,” भाजपच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप
दरम्यान, सरकारने नेमलेल्या समितीत अपर मुख्य सचिव ( राज्य उप्तादन शुल्क ), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई, राज्य उप्तादन शुल्क आयुक्त, उपसचिव, ऑल इंडिया ब्रुवरीज असोशिएसनचा प्रतिनिधी, अपर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पाच जणांची समिती स्थापन केली आहे. ही समिती एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करेल.
महाराष्ट्रात बियरची कमी विक्री का होते याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बियर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.
या समितीमध्ये बियर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे.
मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी… pic.twitter.com/jVJus3Y3pZ
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) October 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे निलेश राणेंनी घेतली राजकारणातून निवृत्ती, नारायण राणेंनी समजूत काढली पण….
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अन् माजी राज्यपाल असलेल्या काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती
हेही वाचा…दसऱ्याच्या मुहर्तावर ‘शरद पवारां’ची मोठी घोषणा, आगामी निवडणुकांसाठी मोठी आखली रणनिती
हेही वाचा…“सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर..,”युवा संघर्ष यात्रेतून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा
हेही वाचा…यामुळेच माजी खासदार निलेश राणेंनी राजकारणातून घेतला सन्यांस, तर्कवितर्कांना उधाणं