मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील दिवाळी तुरूंगातच जाणार आहे. 100 कोटी वसुली प्रकरणी त्यांच्यावर इडी आणि सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अलिकडेच झालेल्या सुनावणीत सर्वाेच्च न्यायालयाने ईडीच्या गुन्हातून त्यांना जामीन मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र सीबीआयमधील गुन्हेंमध्ये त्यांना अद्यापही जामीन मंजूर करण्यात आला नाही.
“तर येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा दुष्काळ दिसेल”; राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर निशाणा
अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सीबीआयमधील गुन्हांमध्ये देखील जामीन मंजूर व्हावा. यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांची यंदाचीही दिवाळी तुरूंगातच जाणार आहे. गेल्या 11 महिन्यापासून अनिल देशमुख तुरूंगात आहेत. त्यामुळे त्यांना जामीन अर्ज मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
“प्रत्येक जण गट स्थापन करतोय, माझा ही गट लवकरच दिसेल”; दिपाली सय्यद
यातच गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील अद्याप दिलासा मिळालेला नाही. आज झालेल्या सुनावणीत त्यांची देखील 14 दिवसांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबरोबर राऊतांची दिवाळीही तुरूंगात जाणार आहे.
“राज ठाकरे, शिंदे अन् देवेंद्र फडणवीस एकत्र येणार”; तारिख अन् वेळ ही ठरली ?
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. देशमुख यांना कारागृहात योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत आहेत. शिवाय प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचा जबाब महत्वाचा आहे. असं विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारताना नमुद केले.
Read also
- “मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे अन् उद्याही राहिल”
- “ज्यांना कुळव, कुदळ, दांडा कळत नाही, त्यांना शेतीचं काय कळणार”; सुषमा अंधारे
- “माझी 80 वर्षाची आई, म्हणाली…शिवसेनेत जा.. उद्धव साहेबांना तुझी गरज आहे”; संजय देशमुख
- “संजय राऊतांची दिवाळीही तुरुंगातच”; न्यायालयाने आणखी वाढवली कोठडी
- “साहेब चिंता करू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील”