मुंबई – एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान ओरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यामुळे त्यावरून मोठा राजकीय वाद सुरू झाला आहे. यासंदर्भात ओवेसींवर टीका होत असताना त्यावरून राज्य सरकारला देखील भाजपाकडून वेठीस धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर तोंडसुख घेतलं आहे.
संभाजी महाराज जन्मोत्सव कार्यक्रमांच्या गाण्यावर थिरकले, शिवसेना आमदार संजय गायकवाड
शिवनसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार असून त्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. वेळी बोलताना त्यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत सुरू असलेल्या वादावर देखील भूमिका मांडली.
मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
औरंगजेबाची कबर विरोधकांना आत्ताच दिसली का? असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला विचारला आहे. “तुम्हाला ती कबर आत्ताच दिसतीये का? तुमचं राज्य होतं ना ५ वर्ष? तेव्हाच टाकायची ना उखडून. तुम्हाला ते बेकायदेशीर वाटतंय, तर करा तिथे काय करायचं ते. आताही ते करू शकतात. केंद्र सरकारच्या अखत्यारीतली वास्तू आहे ती”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
भाजपकडून शिवसेना-राष्ट्रवादीला सुरुंग; असंख्य कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ घेतले हाती
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापू लागला आहे. अकबरुद्दीन ओवैसी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीला यावेळी भेट दिली. त्यांच्यासोबत इम्तियाज जलील, वारिस पठाण असे एमआयएमचे इतर नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, महाराष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर ते गेल्यामुळे त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत.
Read also:
- “आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
- शरद पवारांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तरूणाला अटक; तरूणांचा मोबाईलही जप्त
- कार्यकर्ता हा वेडा असतो, तुम्ही आमच्या बापावर लिहाल तर..; जितेंद्र आव्हाडांचा कडक इशारा
- “अंगावर भगवी वस्त्रे अन् हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे तु हिंदूची नेता नाही”
- “हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान