तळेगाव दाभाडे : आगामी नगरपरिषद निवडणुक व्दीसदस्यीय रचना पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्या बाबतचा आदेश अद्याप निघालेला नाही. व्दीसदस्यीय पद्धती छोट्या पक्षांना मारक ठरू शकते, त्यामुळे अनेकांनी आक्षेप नोंदवत यास विरोध केला आहे.
काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपाची माघार; राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा ब वर्ग दर्जा आहे. २०२१ ची जनगणना कोरोनामुळे होवू शकली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी २०११ सालच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मागिल पंचवार्षिक निवडणुक व्दीसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. यामध्ये १३ प्रभागांतून २६ नगर सदस्य निवडून आले होते. यामध्ये भाजपचे १४, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ६, तर जनसेवा विकास समितीचे ६ नगरसेवक यांचा यात समावेश होता. नंतर झालेल्या पोटनिवडुकीत भाजपला आपल्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या.
मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचे काहीच चालत नाही; अजित पवारांची मिश्किलपणे नाराजी व्यक्त
सध्या नगरपरिषदेत भाजप १२ तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती, तसेच जनसेवा विकास समितीचे प्रत्येकी ७ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणुक लढविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. प्रभाग रचनेनुसार नियोजन करण्यात पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातले आहे. काही अपक्षांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. राज्या निवडणुक आयोगाने वार्ड रचनेचा प्रारुप कच्चा आराखडा तयार कऱण्याच्या सुचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर आता इच्छुक उमेदवार मतदारांच्या इच्छा आाकंक्षा जाणून तरी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. संभाव्य उमेदवारांना चाचपणी सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी पॅटर्न राबविणार का?
आगामी निवडणुकीत जनसेवा विकास समितीची भूमिकाही महत्वपुर्ण ठरणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न राबवला जाणार आहे का? या विषयी प्रचंड उत्सुकला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात कोणते पक्ष उतरणार, त्यांची भूमिका काय असणार यावर बरेचसे अवलंबून आहे. सध्या तरी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुक फिव्हर चढू लागला आहे.
Read Also :
- शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा
- परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडी चौकशी; स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलींची घातली शपथ
- शिवसेना खासदार भावना गवळीच्या अडचणी वाढल्या; निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक
- धनंजय मुंडेंना पुढील 10 निवडणुकांमध्ये परळीत कोणीही रोखू शकणार नाही – जयंत पाटील
- मोठी बातमी! प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पुराच्या पाण्यात गेली वाहून