मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात मोठा राजकीय भुंकप आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांचा बंड मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांची भेट घेतली आहे.
“बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार
बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचं शरद पवारांनी काल स्पष्ट केले आहे. तसेच सरकार पडल्यानंतर त्याची पुढची तयारी ठेवा अशा सुचना देखील शरद पवारांनी काल कार्यकर्त्यांना दिल्या. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असं म्हणणारे शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. तसेच आज शरद पवारांची भेट संजय राऊत यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यामुळे बंड खरोखरोच मोडून निघेल का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
अजित पवारांनी काल शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा कोणताही हात नसल्याचे म्हटले होते. तसेच जोपर्यंत महाविकास आघाडी सत्तेत आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेने सोबत राहिल, असं जयंत पाटलांनी देखील म्हटलं आहे. काल फक्त राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदारांसोबत शरद पवार बैठका घेत होते. मात्र आज त्यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे.
एकनाथ शिंदेंचं बंड अन् दोन दिवसातच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरीत
दरम्यान, तसेच बंडखोर 12 आमदारांना निलंबित करण्याचा पत्र आज शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील संपुर्ण जिल्हाप्रमुखांची बैठक बोलवली आहे. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाजपकडून राज्यापालांना पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींत थेट भाजपने उडी घेतली आहे.
Read also:
- “नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
- सगळं ठरलंय, फडणवीस मुख्यमंत्री, अन् शिंदे साहेब उपमुख्यमंत्री; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
- “गुवाहाटीत रूसलेले शिवसेनेचे आमदार उद्या मुंबईत दाखल होतील” जयंत पाटील