मुंबई : बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची तब्बल ११ तास चौकशी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते. तर ईडी कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शरद पवार रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत बसून राहिले होते. त्यावरून आता अजित पवार गटाकडून जोरदार टिका करण्यात येत आहे.
हेही वाचा…मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे पाटलांना कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांचा दिला वेळ, मराठा आंदोलक माघारी फिरणार का ?
काल ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर रोहित पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात गेले तर शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून राहिले. यावरून रोहित दादाची ईडी चौकशी चालू असताना पवार साहेब सकाळ पासून पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसून आहेत, असंच दादा, नवाबभाई, भुजबळ साहेब, अनिल देशमुख, जयंत पाटील, हसन मुश्रीफ साहेब, प्राजक्त दादा तनपुरे व इतर सहकाऱ्याच्या वेळी ठाण मांडून बसायला पाहिजे होते. इतरांना वेगळा न्याय आणि रोहित दादाना वेगळा न्याय का ? असा सवाल अजित पवार गटाने केला आहे.
हेही वाचा…इंडिया आघाडीत सर्वात मोठी फुट ; ममता बॅनर्जींनंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांनी देखील दिला स्वबळाचा नारा
दरम्यान, बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची चौकशी करण्यात आली असून येत्या १ फेब्रुवारी ईडीने पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेतेही यावेळी उपस्थित होते. शरद पवार पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांचं कौतूक केलं.
रोहित दादाची ED चौकशी चालू असताना पवार साहेब सकाळ पासून पक्ष कार्यालयात ठान मांडून बसून आहेत असंच दादा,नवाब भाई,भूजबळ साहेब,अनिल देशमुख साहेब,जयंत पाटील साहेब,हसन मुश्रीफ साहेब प्राजक्त दादा तनपुरे व इतर सहकाऱ्याच्या वेळी ठान मांडून बसायला पाहिजे होते.इतरांना वेगळा न्याय आणि…
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) January 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…ईडीच्या चौकशीनंतर तब्बल ११ तासानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल”
हेही वाचा…“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार
हेही वाचा…मोठी बातमी…..! “मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा”
हेही वाचा…डॉ. उल्हास पाटील अन् केतकी पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, रावेर लोकसभेची चुरस वाढली