मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात तब्बल १२ तास चौकशी झाली. बारामती अॅग्रो कंपनी कारखानाबाबत रोहित पवारांची मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात चौकशी पार पडली. १२ तासाच्या चौकशीनंतर रोहित पवारांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले. बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई होत असावी असं लोकाचं मत असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…इंडिया आघाडीत सर्वात मोठी फुट ; ममता बॅनर्जींनंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांनी देखील दिला स्वबळाचा नारा
बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची चौकशी करण्यात आली असून येत्या १ फेब्रुवारी ईडीने पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेतेही यावेळी उपस्थित होते. शरद पवार पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांचं कौतूक केलं.
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये दाखल, खासदार रक्षा खडसे यांना मोठा धक्का, उमेदवारी जाणार?
७ वर्षापासून राजकारणात आलो असून यात थोडासा नवीन आणि बऱ्याच लोकांना मी बच्चा वाटतो अशा परिस्थितीत एखाद्या लहान मुलाल, कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी बापमाणूस लागतो आणि ते पवार साहेब तिथे आहेत. असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. बापाला आम्ही बापच म्हणतो. नंतर बापाचे वय कधी काढत नसतो, त्यामुळे आमचे बाप हे पवार साहेबच आहेत आणि तेच आमचे मार्गदर्शक आणि पाठबळ देण्यासाठी इथे होते आणि त्यांचा एक नातू आणि कार्यकर्ता म्हणून नेहमीच मला प्रेरणा राहणार असून ती कधीच बदलणार नाही. असेही रोहित पवार म्हणाले.
सामान्य लोकांना जर सध्याच्या परिस्थितीबद्दल विचारले, तर त्यांना धुरच धुर हा दिसत आहे. खास करून इलेक्शन जवळ आल्यानंतर तो जास्तच प्रामुख्याने जाणवायला लागलेला आहे. कारण या धुराला थोडा वास देखील येत आहे. ईडी ऑफिसमध्ये सर्व सहकाऱ्यांनी मला उत्तम सहकार्य केले. माझ्याकडे होते तेवढे सर्व कागदपत्र त्यांना दिले. आता परत एक फेब्रुवारीला मला परत कागदपत्र घेऊन बोलवले आहे. तिथे जाऊन त्यांना जे काही सहकार्य करायचे असेल ते करणार असेही रोहित पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल”
हेही वाचा…“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार
हेही वाचा…मोठी बातमी…..! “मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा”
हेही वाचा…डॉ. उल्हास पाटील अन् केतकी पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, रावेर लोकसभेची चुरस वाढली
हेही वाचा…मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे पाटलांना कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांचा दिला वेळ, मराठा आंदोलक माघारी फिरणार का ?