कोल्हापूर : प्रशांत किशोर यांच्यासारख्या स्वयंघोषित भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची मुंबईत दीर्घ बैठक झाली होती. त्यानंतर आज पुन्हा दिल्लीत दोघांमध्ये बैठक झाली. त्यावरुन पडळकरांनी टीकास्त्र सोडलं.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
पडळकर म्हणाले, समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याची व्यवस्था राज्य सरकार करतं आहे. ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण नाकारलं गेलं. तारखा पुढे ढकलण्याशिवाय राज्य सरकारने काही केलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. भाजपने २६ जूनला चक्का जामची हाक दिली आहे. प्रस्थापितांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवलं. यापुढे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असा आरोपही पडळकरांनी केला.
हे पण वाचा, ‘प्रशांत किशोरांच्या नका लागू नादी, 2024 मध्ये पंतप्रधान बनणार आहेत मोदी’
हे चुलता पुतण्याचं भ्रष्टाचारी सरकार आहे. मागासवर्गीय उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार कसे होऊ शकतात? हा मनमानी कारभार चालला आहे. उपसमितीचं नेतृत्व अजितदादांकडे दिलं. कोणतीही चर्चा न करता त्यांनी काम केलं, हे काँग्रेसवालेच सांगत आहेत. मराठा समाजाच्याही ताटात माती टाकायचं काम यांनी केलं आहे. बहुजनांवर अन्यायाचं षडयंत्र या सरकारने रचलंय. काँग्रेस मूग गिळून गप्प बसलंय. त्यांचं काका पुतण्या पुढे काही चालत नाही, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.
Read Also :
- “भुजबळ खुर्चीवर बसले आणि…”, नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात झाला गोंधळ
- “नवी मुंबई विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच नाव पाहिजे”- राज ठाकरे
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
- अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी अंगलट; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक
- बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार