मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर पत्रा चाळ प्रकरणी ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांना आता ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी देखील सुनावणी आहे. संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज्यात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. तर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचे ग्रामीण कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काही फोटो ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचा असेल, तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा”
इडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेत्यांसाठी शरद पवारांना वेळ नसल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 3 नोव्हेंबर 2021 रोजी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याचबरोबर माजी अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना देखील 23 फेब्रुवारी 2022 रोजी इडीने अटक केलीय. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तुनपुरे यांच्या कारखान्याची चौकशी, करण्यात आली. 28 फेब्रुवारी त्यांच्या 7.6 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. तसेच माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचीही देशमुखप्रकरणी चौकशी सुरू आहे.
“संजय माझा जुना मित्र, त्याचा मला अभिमान”; उद्धव ठाकरे
अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात फोटोमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या हाताला शरद पवार यांनी पकडले आहेत.तसेच त्यानंतर संजय राऊत यांचा देखील त्यात फोटो असून संजय राऊतांच्या हाताला देखील शरद पवारांनी पकडले आहे. यावरून अतुल भातखळकर यांनी त्या फोटोला खाकस्पर्श असा कॅप्शन दिला आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात : खासदार अमोल कोल्हे
दरम्यान, अतुल भातखळकर यांना नेमकं या फोटोतून काय सुचवायाचं आहे. ते अजून समजलं नाही. परंतु शिवसेना तसेच इतर नेत्यांना इडीच्या खाईत लोटण्याचा काम शरद पवारांनी केलं आहे. असा त्या फोटोमधून अतुल भातखळकर यांना सुचवायंच असेल अस दिसतंय.
खाकस्पर्श… pic.twitter.com/uBs5qq0qal
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
Read also
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
- “भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
- संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी
- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद