मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं टाळलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पक्षप्रमुख असा उल्लेख केलेला नाही, तर पवारांनी सावरल्याचं दिसत आहे. तर शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी फक्त उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणुन उल्लेख केला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख हे पद हवे आहे. का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळत शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री ठाकरे यांना निरोगी दिर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना असं ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे शिंदे यांनी पक्षप्रमुख असा उल्लेख केला नाही तर पवारांनी ठाकरे यांना सावरल्याचं दिसत आहे.
“युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी देश सांभाळा म्हटलं होतं, यांनी तर..”; ठाकरेंचा भाजपवर निशाणा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं टाळलं आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीही पक्षप्रमुख असा केला नाही. यामुळे शिवसेना आणि शिंदे यांच्यातील वाद चांगलाच दिसुन येत आहे.
“त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लागणारच”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा, असं उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं ट्विट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
Read also
- “उद्धव ठाकरेंना मराठा समाज्याच्या नेत्यांना मोठं होऊ द्यायचं नाही”; रामदास कदमांचं ठाकरेंवर खळबळजनक आरोप
- “काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं
- “काय ती जनहिताची उत्तरे, काय ती मुलाखत, एकदम ओक्के”; काॅंग्रेसने पुन्हा एकदा डिवचलं
- उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांकडून मोठं गिप्ट; सदस्य नोंदणीचे अर्ज अन् शपथपत्राचे मोठे गठ्ठे भेट
- “तुमच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत इतका पझेसिव्ह पणा का?” मनसेचा सवाल