पुणे : शिंदे गटाकडून सुरूवातीला त्रिशुळ, उगवता सुर्य आणि गदा ही तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणुक आयोगाकडे ठेवला होता. मात्र शिंदे गटातील तिन्ही चिन्हे निवडणुक आयोगाने रद्द केले. त्यानंतर शिंदे गटाकडून ढाल-तलवार, सुर्य आणि पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवले. यापैकी शिंदे गटाला निवडणुक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.
“बाळासाहेबांच्या नावाची कुणीही चेष्टा करू नका”; अन् शहाजी बापू पाटील भडकले
शिंदे गटाला तळपता सुर्य हे चिन्ह नाकारताना निवडणुक आयोगानं स्पष्टिकरण दिलं आहे. तळपता सुर्य हे चिन्ह मिझोरमच्या झोराम नॅशनलिस्ट पार्टीच्या सुर्य आणि डीएमके च्या उगवता सुर्य या चिन्हांशी मिळतं जुळतं आहे. शिवाय सफरचंद, कोबी, फुटबॉल या मुक्त चिन्हांसोबत या चिन्हाचा गोंधळ होऊ शकतो. असं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.
“कालपर्यंत जे बाप चोरला म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारताहेत”
त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मशाल ढाल तलवारीला भारी पडणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यावरून भाजपची ढाल, इडीची तलवार आणि जनतेवर वार अशा शब्दात रूपाली पाटलांनी शिंदेंवर टिका केली आहे.
“आज ‘हिंदुधर्मरक्षक’ देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं”; तुषार भोसले
दरम्यान, आगामी काही महिन्यात अंधेरी पुर्व पोटनिवडणुक होऊ घातली आहे. यातच उद्धव ठाकरे यांना नवं चिन्ह आणि नवं नाव घरोघरो पोहचवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्याची तयारी देखील आता उद्धव ठाकरेंनी केली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाने माघार घेतल्याने आता भाजप विरूद्ध उद्धव ठाकरे अशी रंगत रंगणार आहे.
Read also
- “पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही”; भाजपची ठाकरेंवर खरमरीत टीका
- अंधेरी निवडणुसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस पाठोपाठ राजकीय पक्षांचा देखील ठाकरेंना पाठिंबा
- “पालघरच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या साधूंना नक्की न्याय मिळेल”; गिरीश खत्री
- “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी…”; उद्धव ठाकरेंनी उंचावली हाती मशाल
- उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह दिल्यानंतर भुजबळ चर्चेत; छगन भुजबळ म्हणाले, “अनेकांचे रक्त आटलं…;”