मुंबई : शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पुर्व विधानसभेची जागा रिक्त झाली. त्या जागेवर आता पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने आपली उमेदवारी दिली आहे. राज्यातील राजकारण पेटत असताना काॅंग्रेसपाठोपाठ आता राज्यातील राजकीय संघटनांनी देखील शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे.
“आज ‘हिंदुधर्मरक्षक’ देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं”; तुषार भोसले
अंधेरी पोट निवडणुकीत भाजप आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपला अद्दल घडविण्यासाठी राष्ट्रावादीसह काॅंग्रेसने देखील आपला पाठिंबा उद्धव ठाकरे यांना जाहिर केला आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित विलासराव देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
“पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली, अन्यायाला जाळीत..;” सुषमा अंधारे
तसेच आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर जनता दल से प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी देखील भेट घेऊन अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना पाठिंबा दर्शविला.
शिंदे गट ‘रिक्षा’ चिन्हासाठी आग्रही..! शिंदेंनी आयोगाला पाठवले दोन मेल
दरम्यान, मागच्या वेळी रमेश लटके यांना 60 हजारांपेक्षा अधिक मत पडली होती. तर अपक्ष म्हणून उभे असलेले मुरजी पटेल यांना 4500 हजार मत तर तिसऱ्या क्रमांकावर काॅंग्रेस होती. यावेळी भाजप आता मोठी रणनिती आखून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
Read also
- “पालघरच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या साधूंना नक्की न्याय मिळेल”; गिरीश खत्री
- “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी…”; उद्धव ठाकरेंनी उंचावली हाती मशाल
- उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह दिल्यानंतर भुजबळ चर्चेत; छगन भुजबळ म्हणाले, “अनेकांचे रक्त आटलं…;”
- “बाळासाहेबांच्या नावाची कुणीही चेष्टा करू नका”; अन् शहाजी बापू पाटील भडकले
- “कालपर्यंत जे बाप चोरला म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारताहेत”