मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून शिंदे आणि ठाकरे अशी राजकीय लढाई सुरू आहे. यातच आता निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला वेगवेगळी नावं दिली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळालं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांनी एल्गार पुकारला आहे. आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
शिंदे गट ‘रिक्षा’ चिन्हासाठी आग्रही..! शिंदेंनी आयोगाला पाठवले दोन मेल
निवडणुक आयोगाने चिन्ह दिल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरील डिपी बदलून नवीन चिन्ह ठेवले आहे. काही ठिकाणी मशाली पेटवून शिवसैनिकांनी नव्या चिन्हांचं स्वागत केलं आहे. तर ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे. असं ट्विट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आज मातोश्रीसमोर काही शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन देखील केले.
“नाव, नेता अन् चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो..”; अंबादास दानवेंनी शिंदेंना फटकारलं
आज मातोश्रीवर काही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी मोठ्या आवाजात घोषणा देखील दिल्या. यावेळी शिवसैनिकांनी आणणलेली मशाल देखील उद्धव ठाकरे यांनी उंचावून शिवसैनिकांना मशाल घरोघरी पोहचवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आगामी अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना याचा सामाना करावा लागणार आहे.
“धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”
दरम्यान, निवडणुक आयोगाने काल उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राजकीय पक्षाचं नाव दिलं आहे. यातच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. आज शिंदे गटाने तळपता सुर्य, ढाल तलवार, आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर केले आहेत. यावर आता निवडणुक आयोग निर्णय घेऊन शिंदे गटाला निवडणुकीसाठी राजकीय चिन्ह मिळणार आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह दिल्यानंतर भुजबळ चर्चेत; छगन भुजबळ म्हणाले, “अनेकांचे रक्त आटलं…;”
- “बाळासाहेबांच्या नावाची कुणीही चेष्टा करू नका”; अन् शहाजी बापू पाटील भडकले
- “कालपर्यंत जे बाप चोरला म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारताहेत”
- “आज ‘हिंदुधर्मरक्षक’ देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं”; तुषार भोसले
- “पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली, अन्यायाला जाळीत..;” सुषमा अंधारे